Tuesday, 22 June 2021

24yrs of a old baggage on my shoulders

 24yrs of a old baggage on my shoulders.


Leaving all of the baggage down...trying to tolerate the my own existence. 

ओझा आणि जबाबदारी ह्यात खूप बारिक फरक आहे.

ओझा हे लादला जाते तर जबाबदारी ही स्वतःहून हा घेतली जाते. 

मी आता ओझा चा बैल झालिये. आज लग्नाला 24 वर्षा झाली...

मी सासरी घरी आले तेव्हा वृद्ध वृद्ध म्हणून पंचाहत्तरी चे वर्षाचे सासरे आज 24 वर्षानी 9४ पूर्ण झाले... 

मी स्वतः चा बाबांना नाही सांभाळेल तेव्हढे त्यांना सांभाळून समजुतीने राहिले. सासर्‍यांच्या सेवेत कुठे कमी पडू दिले नाही. सर्व प्रेमाने आणि समजूतदारपणे केले.

दीर जाऊ नणंद असून सुद्धा कुणी त्यांची येवढे कधी जबाबदारी घेतली नाही. 

मुले तहान लहान असताना दीर जावेने देवधर्म कर्म माझ्या वर जबाबदारीचा ओझे लादून ही मोकळे झाले. 

सासर्‍यांच्या अध्यात्म सेवा मंडळाच्या पसारा, मुले त्यांची दुखणी , अभ्यास, शाळा , स्वतःची कलाकार ही ओळख पूर्ण विसरून जात होते. स्वागतासाठी कधी वेळ द्यावा म्हणाला तरी देता येत नसे. 

एकदा घाव बसला असला की त्याचे व्रण कधी जात नाहीत...दुखणे बरे होते...दैनंदिन जीवनात सारून जाते...

स्वतः च्या लेकी सुना आल्यावर सगळे चित्राची कायापाळत झाली...आणि समजूतदार पणा चा आव चा आला...

आधी ह्यांची कणव कुठे गेली होती?

आता मारे पुळका दाखवितात?

काय ऊपयोग गीता वाचून अध्यात्मात पुटपुटून...

स्वतःवर चा ओझा दुसर्‍या वर लादण्याचा हा डिप्लोमॅटिक स्वाभाव बाकी काय? 

दुसर्‍याने केलेले पटत नाही...

असतात असेच सगळे. 

आता झाला गेला विसरता येणे नाही पण माफ करून पुढे जाणे हे आमचे संस्कार..

त्यातून खूप कणखर नक्कीच झालिये.

शुगर काय उगाच आली नाहिये. मी त्याला मजेने ओझा ची शुगर म्हणते. 

ह्या सगळ्याचे विक्षिप्त पणा माझ्या अंगाशी आलाय. 

आज 24 वर्षे मी नवरा आणि सासरे बांडगूळ पाठीवर घेऊन ही गोगलगाय चाललीय.

असाच सोडून नक्कीच देणार नाही. 

आता जरा कुठे ही गोगलगाय डोकं वर करू लागलीये. स्वतःची ओळख, आवड जोपासू बघतेय. 

जेवढे जमेल तेवढे करत राहणार. 

आज 24 वर्षा पूर्ण झाली तेव्हा हा बांध फुटला.

सगळे अप्पलपोटी असतात 24 वर्षा खूप ज्ञान देऊन गेली. सख्खे कसे बदलतात हा धडा शिकवून गेला.

इति - Ila


.

No comments:

Post a Comment