Girinar Darshan trek
पहाटे च्या ब्रम्हा प्रहरी पहिल्या पायरी ल नमस्कार करून गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली...
||श्री गुरू देव दत्त||
||जय शंकर||
||श्री स्वामी समर्थ||
दत्तजयंती होऊन गेली होती आणि चंद्र प्रकशात आम्ही बारा जणा भक्ती भावाने एकत्र येऊन गिरनार ट्रेक करायचा दिवस आला...
सहज माझी मैत्रीण शुभांगी चा फोन आला आणि तिने गिरनार ट्रेक करायचा का असे प्रपोज केलं आणि आम्ही चौघी पंचवटी गँग लगेच तयार झालो. पंचवटी गँग म्हणजे आम्ही नुकताच मे महिन्यात फा कोंडा ट्रेक करून आलो होतो...इतके वर्ष पंचवटीत राहत होतो... ओळख होती... मैत्री होती...तिघींनी ची मुले माझी विद्यार्थी...तर आया ह्या सगळ्या इतक्या वर्षात मैत्रिणी झाल्या होत्या...पण nature वेडे, adventure वेड हे
ते आता आमची मुलं मोठी झाली independent झाली आता स्वतः ची आवड जोपासायला सुरुवात केलेल्या आम्ही चौघी...पहा कोंडा ट्रेक नी अमचात छान गट्टी जमली...एक खूप positive connect zala....
मागचा वर्षीच मी आणि सुयोग नी कोजागिरी पौर्णिमेला गिरनार ट्रेक केला च होता तो अनुभव होताच...असे ठरवताना आमचे नवरे आणि मुले ही ह्या प्लॅन मध्ये शामिल झाली ...n क्या बात आमची ही गिरनार टीम तयार झाली...मग सर्व travel plans, bookings chya भेटी गाठी, कॉफी पे चर्चा executions सुरू झाले...नवरे लोकांची ही ह्या मध्ये एकमेकांशी छान ओळख झाली होती मस्त टीम तयारीला लागली...मग टेकडी, सिंहगड प्रॅक्टिस सुरू झाल्या...मुले येणार होती सो त्यांना ही practice sessions मध्ये त्याचा सोयीनुसार घेऊन जात ...एक दिवस टेकडी क्रिकेट गेम झाला...टीम n stamina building practice sessions suru झाले...
पूनम फिजिओथेरपिस्ट, वृषाली डॉक्टर, शुभांगी महेश ही ट्रेकर जोडी, उदयन फिटनेस वाला, सुयोग runner, अमित फिटनेस असलेला आणि मी अशी टीम तयार झाली....मी जस्ट दोन आठवडे आधी एक Panna Khajuraho cycling tour करून आले होते सो जरा practice मध्ये होतेच...तसा ही सध्या EBC n pha konda ट्रेक नंतर स्वतःला challenging असा हाच ट्रेक होता....
मुले ही तयार होतीच... सगळा चमू तयार झाला...आणि आम्ही ट्रेन नी अहमदाबाद ल पोचलो...तिथून १२seater बस बुक केली होती ती station वर घ्यालाला आली...महेश चे खूप दिलदार मित्रांनी आमची सर्व हॉटेल्स आणि नाष्टा ची सोय करून ठेवली होती... श्री सोलंकी ह्याचा मेहमान नावजी ने आम्ही पुणेकर अचाट च थक्क च झालो... अहमदाबाद मधला पहिला नाष्टा जलेबी फाफडा, आणि खूप मोठा platter असा उत्तम स्वादिष्ट नाष्टा करून आम्ही जुनागड ला दंगा मस्ती करत पोचलो...अवरून सावरून रात्री एक नंबर गुजती थाळी आणि पाना चा अस्वाद घेतला आणि पडी मारली...रात्री अडीच वाजता निघून लवकर पहाटे गुरुशिखर चढायचा होता...
पहाटे च्या ब्रम्हा प्रहरी पहिल्या पायरी ल नमस्कार करून गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली...
||श्री गुरू देव दत्त||
||जय शंकर||
||श्री स्वामी समर्थ||
दत्तजयंती होऊन गेली होती आणि द्वादशी चा चंद्र प्रकशात आम्ही बारा जणा भक्ती भावाने एकत्र येऊन गिरनार ट्रेक करायला सुरुवात केली...किर जंगल आणि आम्ही एकटेच ....अजिबात गर्दी नव्हती सो थोडा छान ही वाटत होता पण तेवढी च भीती ही सो सगळ्यांनी एकच स्पीड नी चढायचा ठरविलं...
९९९९ येवढ्या पायऱ्या एक एक करत पहिला पडावं, १००० /५००/ अशी गणितं करत ५००० पायऱ्या चढून वर आलो...गोळ्या पौष्टिक खाऊ करत नवनाथ शिखर पार करून गुरुशिखराच्या पायथ्याशी आलो... शेवटच्या काही पायऱ्या ९०००...८९९९ असे मोजत मोजत पायांचे तुकडे झाले होते... श्री गुरू देव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा क्या जयघोषात सगळे एक एक पायरी चढत होतो...आता किर अंधार सरून उजाडायला सुरुवात झाली....तो क्षण टिपण्या साठी सगळे जाणं फोटो काढू लागले...
किती ही भारी phone camera असला तरीही डोळ्यात साठवलेले क्षण त्यात मनात आलेला भाव ह्याची जी काही आठवण असते ती कुठल्या ही device मध्ये टिपता येत नाही हे खरं!! गुरुशिखर चढून वर आलो ९९९९ पायऱ्या आता संपल्या होत्या...आणि आता ओढ होती गुरू पादुकांची...एक पहाट...एकडे तांबडा फुटला आणि तिकडे गुरू पदिकांच दर्शन घेऊन आमची सवांची मन शांत आणि प्रफुल्लित तृप्त झाली....मुलांनी ही तो आद्वैततीया अनुभव घेतला... हा एक नवीन अनुभव होता...गुरू चरणी येण्या साठी किती कष्ट आणि परिश्रम करावे लागतात...तुमचा बळा वरच इथे येणे शक्य ...नतमस्तक होणे...हा अनुभव अद्वितीय आहे. प्रत्येकाने स्वानुभव घेतला... धूनीचे दर्शन प्रसाद
घेऊन आता परतीचा ओढ लागली आणि मग पायऱ्या उतरायचाही होत्या...आधी सगळे म्हणत होते की ropeway नी उतरू पण मग अचानक सगळ्यांनी पायऱ्या उतरुंच जाऊ असे म्हणाले...अमित थकला होता सो तो एकटाच ropeway नी गेला ....आम्ही सगळे एक एक पायरी उतरत आलो...उलती गणती सुरू करत खाली उतरु लागलो...मध्ये लिंबू सरबत, ताक असे फराळ करत खाली पोचलो...
ज्या साठी येवढे दिवस practice तयारी केली होती ते सार्थ झाला...सर्वांनी आपले कसे पाय दुखणार ह्यात अंघोल्या पांगोल्या करत थोडा आराम केला मस्त झकास जेवण केला. आता निवांत सूर्ती सोमनाथ कडे क..क.. किरण आमचा गाडी ड्रायव्हर ने हल्लू हल्लु गाडी नेली ... सगळ्यांचा wicket पडल्या होत्या....सोमनाथ ला पोचलो आणि थोडा आराम करून सोमनाथ मंदिर दर्शन घेतले....आजचा दिवस हा खूप भक्ती भावचा होता...पहाट गुरू शिखरावर तर सूर्यास्त पाहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ दर्शन झाल...सुवर्ण दिवसच जणू.
सोमनाथ ते अहमदाबाद प्रवास तर दंगा मस्ती, गाणी, गेम्स आणि ट्रॅफिक जाम मध्ये अडकून च गेला...संपला तो रात्री उशिराच. पण त्यामुळे आमचा connect छान झाला अन खूप च मज्जा मा...प्रवास झाला
शेवटी शॉपिंग शिवाय कोणती ही ट्रेक ट्रीप सार्थ होत नाही...महेशचा आमचा बरोबर शॉपिंग चा patience ची कमाल... सुयोग ग्रुप च एक मेव खजिनदार अशी विभागणी उदयन अमित आणि मुलं आमचा सर्वांना time control managers riverfront var cycling photos Sayee, Varad, Reva Ani Diya अशा गमतीजमती करत
परती च प्रवास सुरू झाला...परत सगळ्या मज्जा वाज्जा करत flight मध्ये खिदलाने करत back to pavilion आम्ही सर्व...
आज परत घराचा रमरागडा आणि क्लासेस चालू...
हे मात्र नक्की उमजला की जिथे बोलावणे येते
दत्तगुरु कृपे ने ते पूर्ण करून घेतात.
आणि मनापासून जावेसे वाटते तिथे एक आपोआप मार्ग मिळतो...छान संगत मिळते अन् खुलते.... मैत्री घट्ट होते... आता पुढच्या ट्रेक ट्रीपचे planning सुरू...
||श्री गुरू देव दत्त||
इति
इला














No comments:
Post a Comment